राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे सु. गी. पाटील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
1222

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील ग्रामीण (प्रतिनिधी)
दि,०३/१/२०२२
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे सु. गी. पाटील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. तसेच ज्या विद्यार्थ्यीनींनी सावित्रीच्या लेकींच्या भुमिका वठवल्या अशा सर्व विद्यार्थ्यीनींना गुलाब पुष्प व सावित्रीचे वाण हे पुस्तकं देऊन गौरविण्यात आले. रा.काँ.महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, तालुका अध्यक्षा रेखा पाटील, समाज सेविका मीनाताई बाग, शहराध्यक्षा हर्षा पाटील यांची उपस्थिती होती. विद्यालयाच्या वतीने प्राचार्य विश्वासराव साळुंखे यांनी महिला पदाधिका-यांचे स्वागत केले. सदरप्रसंगी पर्यवेक्षक अरूण पाटील, उपप्राचार्य संदीप सोनवणे, पी. जे. विसपुते, रेखा कसोदे, मोहिनी वेळीस्कर, ज्योती तांदळे, रूपाली ठाकुर, मिनल पाटील, किरण सुर्वे, सुनंदा पाटील, मंजुषा पाटील आदि महिला शिक्षिका व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.