पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर [ माजी आमदार दिलीपभाऊ वाघ ]

0
1163

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
दिनांक – 6  जानेवारी, 2022
पाचोरा शहर प्रतिनिधी

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात पाचोरा तालुका उपाध्यक्षापदी प्रा.सुनिता मुनीर सोहत्रे यांची
पाचोरा शहराध्यक्षपदी सौ रेश्मा सुनील नवगिरे यांची ,
पाचोरा शहर सचिव पदी सौ कीर्ती अजय अहिरे यांची नेमणूक करण्यात आली याबाबतचे नियुक्तीपत्र  पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या राज्य सचिव सौ प्रतिभाताई शिरसाठ, तसेच पाचोरा तालुका अध्यक्षा प्रा. वैशालीताई बोरकर, नगरसेविका सौ सुचेताताई वाघ,भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील भडगाव युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील,संदीप चव्हाण व आदी पदाधिकारी उपस्थित होते