गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार ? पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल

0
690

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 9 जानेवारी, 2022

गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार ? पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल

पुणे पोलिसांचं पथक जळगावात दाखल
विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी चौकशी

महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

 भाजपचे आमदार गिरीश महाजन संशयित असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचं पथक जळगावात दाखल झालं आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे.