पाचोरा जामनेर पिजी कायमस्वरूपी बंद ! कृती समितीने दिला आदोलनाचा ईशारा !

0
2238

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी

दि,११/१/२०२२

पाचोरा जामनेर पिजी कायमस्वरूपी बंद !
कृती समितीने दिला आदोलनाचा ईशारा !
पाचोरा : येथील पाचोरा ते जामनेर इंग्रजांच्या कार्यकाळात १०० वर्षापूर्वी लहान लाईन असलेली पीजी ही आता कायमस्वरूपी बंद झाली असल्याचे पत्र अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रशासकीय भुसावळ यांनी बचाव कृती समितीला पाठवलेले आहे.कोरोना नंतर पाचोरा जामनेर पिजी सुरू करण्यासाठी जळगांव लोकसभेचे खा,उन्मेष पाटील व रावेर लोकसभेचे खा, रक्षा खडसें यांचे अपयश झाले आहे. केंद्र सरकारने पाचोरा जामनेर वाशियाचा इतिहास पुसलेला असून या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.सविस्तरपणे वृत्त असे की गेल्या दोन वर्षांपासून लॉकडावुन मुळे सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आले होते.या काळात केंद्र सरकारने अनेक कारनामे करून बरेंच शासकीय मालमत्ता खाजगीकरण करून घेतले आहे,करोनाची परिस्थिती हळूहळू सुरळीतपणे झाल्या नंतर रेल्वे गाड्या सुरू होत असून पाचोरा जामनेर पीजी देखील सुरू करण्यासाठी पाचोरा कृती समिती तयार करून या समितीने सर्व पक्षीय बैठक घेऊन खा उन्मेष पाटील आ किशोर पाटील व भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी एकत्र येऊन पिजी सुरू करण्याची मागणीचा निर्णय घेण्यात आला होता.या बैठकीत खा उन्मेष पाटील यांनी पिजी बंद होणार नाही ती बंद झाली तर माझे अपयश असेल असे सांगितले होते.त्या मुळे पिजी बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात असून कोण्ही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आव्हान केले होते.मात्र ५ जानेवारी २०२२ रोजी पाचोरा पिजी बचाव कृती समितीला
अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रशासकीय भुसावळ यांनी पत्र पाठवलेले आहे.की ही पिजी कायमस्वरूपी बंद झाली आहे. आता कृती समितीने आदोलनाचा ईशारा दिला असून अध्यक्ष, खली दादा देशमुख, कार्याध्यक्ष, अविनाश भालेराव, खजिनदार, पप्पू राजपूत, उप अध्यक्ष, भरत खंडेलवाल, विकास वाघ, पप्पू बाविस्कर, नंदू सोनार, ॲड भोईट अण्णा, अरुण पाटील सर यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न