पाचोरा तालुक्यातिल पिंपळगाव (हरे.) येथील जवान संदिप कुंभार यांचे  सेवानिवृत्तीनंतर जल्लोषात स्वागत

0
836
 1. आरोग्यदुत न्युज
  चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
  द११/१/२०२२
  जवान संदिप कुंभार यांचे
  सेवानिवृत्तीनंतर जल्लोषात स्वागत
  पाचोरा तालुक्यातिल पिंपळगाव (हरे.) येथील संदिप दत्तु कुंभार या जवानाने इंडियन आर्मी सिग्नल रेजिमेंट मध्ये शिपाई पदावर तब्बल 17 वर्षाच्या दिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.त्यांचे पाचोरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे गावकरी व नातेवाईकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
  पिंपळगाव (हरे.) येथील संदिप दत्तु कुंभार हे सन 2004 मध्ये औरंगाबाद येथे शिपाई म्हणून सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर जबलपुर येथे प्रशिक्षण घेवुन जम्मु काश्मिर, अलवर, मथुरा, जोथपुर, अशा विविध ठिकाणी तब्बल 17 वर्ष सेवा दिली.त्यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर त्यांचा पाचोरा येथिल राधाकृष्ण नगर येथे नातेवाईन आणी परिसरातिल नागरिकांनी जलोषात स्वागत केले.
  यावेळी त्यांचा सहपरिवार सत्कार व सन्मान करण्यात आला.या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र पाटिल हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक विक्रम पाटिल हे होते.विक्रम पाटिल यांनी संदिप कुंभार याला सामाजिक जिवन जगतांना कोणती काळजी घेशिल याचा मुलमंञ दिला तर तरूणांनी त्याचा आदर्श घेउन देशसेवा कशी करावी यावर अमुल्य मार्गदर्शन केले.या प्रसंगी राधाकृष्ण नगर,माउली नगर,अमृत नगर व देवदत्त नगरमधिल जेष्ठ नागरिक व तरूणांकडुन संदिप कुंभार यांचा सपरिवार सत्कार केला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना संदिप कुंभार म्हणाले की,देशातील प्रत्येक घरातील एका जवानाने सैन्यात भरती होवुन देश सेवा करावी व आपल्या देशाची मान उंच राहील असे कार्य करावे. तर घरी असलेल्या एका भावाने काळ्या मातीची,माता पित्यांची सेवा करावी असे आवाहन ही त्यांनी तरुण पिढीला केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी राधाकृष्ण नगर,माउली नगर,अमृत नगर व देवदत्त नगरमधिल जेष्ठ नागरिक व तरूणांनी परिश्रम घेतले.