घोटीच्या न्हायडी डोंगरावर राजमाता जिजाऊंची जयंती साजरी.तसेच कै. सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

0
715

आरोग्यदुत न्युज
नाशिक जिल्हा
प्रतिनिधी युवराज राजपुरे घोटी
दि 12/01/2022
घोटीच्या न्हायडी डोंगरावर राजमाता जिजाऊंची जयंती साजरी.तसेच कै. सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
ऐतिहासिक वारसा जपत जुन्या पद्धतीने गडकिल्ल्यावर प्रत्येक सण ,कार्यक्रम राबविण्याचे कार्य
घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक करीत असतात. यावेळी मंडळाने घोटीच्या न्हायडी डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात राजमाता जिजाऊंची ४२४ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. यावेळी प्रियंका मराडे हिने राजमाता जिजाऊ चा पेहेराव परिधान केला होता. जिजाऊंची जल्लोषात घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.यानिमित्ताने राजमाता जिजाऊंच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.
तसेच यावेळी अनाथांची माय कै. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शाहीर बाळासाहेब भगत यांनी राजमाता जिजाऊंवर पोवाडा गायन करून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले. या उपक्रमात अध्यक्ष
भगीरथ मराडे,शाहीर बाळासाहेब भगत,बाळासाहेब आरोट, गजानन चव्हाण, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, सुरेश चव्हाण, महिंद्र आडोळे, काळू भोर,उमेश दिवाकर,नितीन भागवत, निलेश पवार, भगवान तोकडे, लक्ष्मण जोशी, सोमनाथ भगत, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसने, निलेश बोराडे,गणेश काळे, जनार्दन दुभाषे, एकनाथ माळी,गोकुळ चव्हाण, शिवदास जोशी,प्रियंका मराडे,नगमा खलिफा इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.