उपसरपंच असलेले मच्छिंद्र दोंदे यांच्यावर प्रभारी सरपंचाची धुरा सोपविण्यात आली.

0
348

आरोग्यदुत न्युज
नाशिक जिल्हा
प्रतिनिधी युवराज राजपुरे घोटी
दि 17/01/2022
उपसरपंच असलेले मच्छिंद्र दोंदे यांच्यावर प्रभारी सरपंचाची धुरा सोपविण्यात आली.
टाके घोटी ता.इगतपुरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया राबविण्यात आली.सरपंचपद आदिवासी महिला राखीव असल्याने तसेच या पदासठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने उपसरपंच असलेले मच्छिंद्र दोंदे यांच्यावर प्रभारी सरपंचाची धुरा सोपविण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी जयंत संसारे व सहाय्यक अधिकारी संदीप दराडे यांनी काम पाहिले.त्यांना तलाठी राम तौर यांनी सहकार्य केले.
सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.दुपारी तीन ला उपसरपंचपदी दोंदे यांच्या नावाची घोषणा झाली.यावेळी ग्रामपंचायत शोभा दुभाषे, धर्मराज आडोळे,भिका पवार,सुनील पवार,आदी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवक चेतन पवार,माजी सरपंच भगीरथ भोर,ज्ञानेश्वर आडोळे,सतीश दोंदे,अण्णासाहेब दोंदे,राहुल दोंदे,भाऊराव दोंदे,सुधाकर दोंदे,मिलिंद दोंदे,भाऊ वाघ व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान दोंदे यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेच्या वतीने त्यांचा घोटी येथे सत्कार करण्यात आला.यावेळी अनिल उन्हावणे,सुनील पालवे,संजय शिंदे,राहुल जगताप आदी उपस्थित होते.