रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, १८/१/२०२२
शिंदाड येथील तमाशा मंडळात गोंधळ घालणार्या सर्व आरोपींची आज रोजी न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
सन 2012 चे डिसेंबर महिन्यात शिंदाड येथे गैबानशा बाबा यांच्या उरूस निमित्त आयोजित तमाशा च्या कार्यकरांमत गोंधळ घालून तमाशा कलावंत स्त्री पुरुषांना मारहाण केली म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून गुरनं 66/2014 हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर शिंदाड येथील सुमारे 16 लोकांना यात आरोपी करण्यात आले होते. 2015 पासून हे प्रकरण पाचोरा न्यायालयात न्यायमूर्ती सिद्दीकी साहेबांच्या न्यायालयात चौकशीला होते. यात फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी व घटनेतील साक्षीदार महिला कलावंत यांचे जाब जबाब झाले. आरोपींतर्फे ॲड अभय शरद पाटील व ॲड दिपक पाटील यांनी काम पहिले तर सरकार पक्षातर्फे ॲड माने यांनी काम पहिले. उभय पक्षातर्फे आपली बाजू मांडल्यानंतर न्यायमूर्ती साहेबांनी आज दी. 18/01/2022 सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गेल्या आठ वर्षांपूर्वी या तक्रारीने महाराष्ट्रात चांगलेच चर्चेला उधाण आले होते. मात्र आजच्या निकालाने यात अडकलेल्या मात्र नोकरी साठी पात्र असलेल्या अनेक युवकांना दिलासा मिळालेला आहे. तसेच आठ वर्षापूर्वी गावातील राजकीय खेळितून या निष्पाप युवकांना अडकविण्यात आले होते त्यांना न्याय मिळाल्याची चर्चा नागरिक करत होते .
Home Uncategorized शिंदाड येथील तमाशा मंडळात गोंधळ घालणार्या सर्व आरोपींची आज रोजी न्यायालयाने केली...