रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, १८/जाने/२०२२
आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचा ” पीजे बचाओ ” रेल्वे कृती समितीला पाठिंबा
लक्ष्मण आबा सुर्यवंशी.
(आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश महासचिव)
डी.आर.एम, (रेल्वे विभाग -भुसावळ)
आपणास नम्र निवेदन करण्यात येते कि,मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना महामारी आपत्ती काळात देशात दळणवळण असणारी साधने सरकारने जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी बंद केली होती. यामध्ये पाचोरा -जामनेर नारोगेज पीजे रेल्वे देखील बंद करण्यात आली होती. पीजे रेल्वे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात येते.ही रेल्वे बंद झाल्याने या रूट वरील नागरिकांचे व्यावसायिक आणि आर्थिक नुकसान आणि प्रवासी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत कोरोना महामारी आजार बऱ्या पैकी आटोक्यात येत आहे. त्यामुळे
पाचोरा ते जामनेर .पि.जे. रेल्वे जनहितासाठी पूर्ववत सुरू करावी. असे पाठींब्याचे निवेदन आईयल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) – चे वतीने पाचोरा-जामनेर रेल्वे बचाओ कृती समितीला संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री.लक्ष्मण आबा सुर्यवंशी यांनी दिले आहे.