राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद ! पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यास मिळाला  ६८ कोटीं रुपयांचा वाढीव निधी नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक !

0
358

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)

दिनांक – 21 जानेवारी, 2022   

राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद !
पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यास मिळाला  ६८ कोटीं रुपयांचा वाढीव निधी
नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक !
जळगाव जिल्हा वार्षीक योजना सर्वसाधारण २२-२3 करीता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय  मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या पाठपूराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  साठी  ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने  झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे कौतुक केले.
जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणाली द्वारे मुंबई  सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात  आज पार पडली. या बैठकीस जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, वित्त व नियोजन विभागाचे अपर सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आ. शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील, आ. अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिष्ठाता रामानंद , सा.बा.चे अधिक्षक अभियंता सौ. गिरासे , सिव्हील सर्जन नागोजीराव चव्हाण, यांच्यासह विविध यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन २०२२ -२०२३ करीता ३५७ कोटी ५० लक्ष  रुपयांचा नियतव्यय मर्यादा ठरवून दिलेली होती. मात्र, कार्यान्वयीन यंत्रणांनी ९८५ कोटी ८८ लक्ष  रुपयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार किमान १०० कोटी रुपयांची जादाची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली. त्यानुसार जिल्ह्याची कामांची निकड लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी ६८ कोटी निधीची वाढ केल्याने  या निधीतून आरोग्य केंद्रांची बांधकामे, पाटबंधारे विभागाच्या योजना, रस्ते विकास, स्मशानभूमी कामे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा वालकंपाऊंड, क्रीडा, अंगणवाडी बांधकाम व जिल्ह्यातील आरोग्य बळकटीकरणासाठी  करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले .