आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

0
549

रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, 25/जाने/२०२२
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा
आमदार किशोर अप्पा पाटील यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ५० लक्ष रुपायांच्या ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते बुधवार दि२६ रोजी सकाळी १0 वाजता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल, जिल्हा शक्य चिकित्सक डॉ नागोजीराव चव्हाण ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यास कोरोनाचे नियम पाळून उपस्थिती देण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.