वीज बिल होळीचे आंदोलन करत भाजपने राज्य सरकारला दिला शॉक ?

0
282

 


या महिन्यापासुन नवीन एका आकराची भर टाकली आहे . त्या नवीन आकरचे नाव आहे . वहन आकार @ 1.18 Rs/U . म्हनजेच मागील बिलाच्या एकूण 35 ते 45 % विजबिलात वाढ झाली आहे . वीज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे . या विरोधात भाजपने आवाज उठवला . ठाकरे सरकारने भरमसाठ वीजबिलांबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे सोमवार दिं.23 नाव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,पाचोरा येथे भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत “वीजबिलांच्या होळीचे आंदोलन” करण्यात आले.तरी सर्व,कार्यकर्ते,पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांनी आपल्या परिसरातील ज्या नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली आहेत त्यांना या आंदोलनाबाबतीत आवर्जुन माहिती घ्यावी  आणि आंदोलनात सहभागी होण्यास सांगावे.आंदोलन च्या वेळी तेथे  सर्व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,  तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे आणि शहराध्यक्ष रमेशभाऊ वाणी, सरचिटणीस दीपक माने,ग्रामीण सरचिटणीस संजय पाटील आणि गोविंद शेलार उपस्थित होते.