आरोग्यदुत न्युज
युवराज राजपुरे
नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 30 जानेवारी, 2022
घोटीच्या सेंद्रिय हळदी प्रकल्पाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट.
तब्बल दोन तास केली प्रकल्पाची पाहणी.
शेती पूरक व्यवसायात महाराष्ट्र राज्य हे पूढे आहे. राज्यातील धार्मिक ,पर्यटन क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवून शेतीकडे वळणाऱ्या युवा पिढीला सलाम करावासा वाटतो. आधुनिक पद्धतीने शेती करून अवकाळी पाऊस ह्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला येतो ते नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक कृषी उत्पन्न वाढवुन शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे प्रतिपादन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियार यांनी व्यक्त केले.
वैतरणा-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील हळदी प्लांटला रविवारी ( ता. ३० ) राज्यपाल कोशियार यांनी भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे,ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील,जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर,प्रांताधिकारी तेजस चव्हाण,तहसीलदार परमेश्वर कासुळे,राज्यपाल प्रबंधक राकेश नतानी,परिसहाय्यक राजेंद्र सिंग,विशेष अधिकारी उमेश कासिकर कृषी अभ्यासक डॉ. प्रशांत झाडे,डॉ. हिरेन पटेल,रोहित लोणकर,डॉ.साईनाथ हाडोळे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर उपस्थित होते.
अत्यंत कमी क्षेत्रावर जास्तीचे उत्पादन घेऊन लागवड खर्च कमी करण्यासाठी इजराईल पद्धतीने राज्यात २७ ठिकाणी ऍग्री एक्वा लॅप या कंपनीने प्लांट सुरू केले आहे. कमी क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील यातून मोठा फायदा होणार असून एकदाच केलेली डेव्हलपमेंट मटेरियल तब्बल ७० वर्षापर्यंत कामी पडू शकते. असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत झाडे यांनी माहिती दिली.
एग्री एक्वा लॅप कंपनीच्या संपूर्ण पीक पद्धतीसह मत्स्यपालन, हळद उत्पादन, बागायती पिके यांची बारकाईने निरीक्षण करून कृषी अधिकारी यांच्याकडून राज्यपाल महामहिम यांनी माहिती समजून घेतली. इजराईल धर्तीवर केलेल्या शेती तंत्रज्ञान विकसित पद्धतीचा वापर राज्यात इतर जिल्ह्यांत करता या दृष्टीने विचार केला जाईल असा विश्वास त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिला.
राज्यातील राजकीय घमासान पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.
फोटो : घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील हळदी प्लांटला भेटी प्रसंगी रविवारी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियार यांसह उपस्थित मान्यवर.
Home Uncategorized घोटीच्या सेंद्रिय हळदी प्रकल्पाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट. तब्बल दोन तास...