पाचोऱ्यात बावीस वर्ष तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून केल्याची घटना.#Pachora

0
10178

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,३०/१/२०२२

पाचोरा पुनगाव रोड रस्त्यावरील बुऱ्हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या  झालेल्या भानगडीत एक बावीस वर्ष तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून  केल्याची घटना घडली.
दि ३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुऱ्हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या  झालेल्या भानगडीत एक बावीस वर्ष तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून  केल्याची घटना घडली.अवस्थेतील तरुणाला जखमी अवस्थेत  खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तो गंभीर अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले पुढील उपचार घेताना जखमी तरुण मयत झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी सह काही संशयितांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा पर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक ३० रोजी पाचोरा येथे भडगाव रोड वरील साई मंदिरा जवळ या घटनेतील मयत भूषण नाना शेवरे वय २२ रा. दुर्गा नगर पाचोरा याचे व संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी वय २२ ( पूर्ण नाव माहीत नाही) याचे वाहनाचा कट लागल्यावरुन वाद झाला होता असे समजते .त्यानंतर संशयित आरोपीने मयत भुषण नाना शेवरे यास पुनगाव रोडवरील बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान फोन करून बोलवले होते.  संशयित आरोपी सोबत यावेळी दहा ते बारा अज्ञात तरुण असल्याचे कळते ? घटना घडल्याच्या ठिकाणी संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी याने वाद होत असताना भूषण नाना शेवरे याच्या पोटात तिक्ष्ण हात्याराने वार करून मयतास गंभिर जखमी केले.गंभीर जखमीस त्याच्या सोबत असलेल्या काहींनी उपचारा साठी एक्स खाजगी रुग्णालयात नेले असता  डॉक्टरांनी  त्यास पुढील उपचारासाठी जळगाव नेण्याचा सल्ला दिला. सदर गंभीर जखमी तरुण  जळगाव येथे मयेत झाल्याचे समजते.? या प्रकरणी पाचोरा पोलिसात संसयीत आरोपी लोकेश उर्फ विकी यासह काही अज्ञात तरुणांना पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी  ताब्यात घेतले आहे. घटनेतील सशयतांची कसून चौकशी करण्यात येत असून असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी असे सांगितले की सदर प्रकार हा तरुणांच्या वाहनाचा कट लागल्या वरून झाला आहे.