पुण्यातील इमारत स्लॅबची जाळी कोसळून मृत्यू पावलेल्या पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली    मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत दुर्घटनेच्या चौकशीचे प्रशासनाला निर्देश

0
257

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान

दिनांक – 4 फेब्रुवारी, 2022

पुण्यातील इमारत स्लॅबची जाळी कोसळून मृत्यू पावलेल्या

पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
दुर्घटनेच्या चौकशीचे प्रशासनाला निर्देश
मुंबई, पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या  दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.