आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,5/2/2022
आरोग्य दूत न्यूज
पाचोरा स्थानाकाच्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. गेल्या 85 दिवसा पासून संप सुरु असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनत चालला आहॆ, पाचोरा महामंडळाच्या संप सुरूच आहे. कामगार व चालक आणि वाहकांना डॉ.भूषण मगर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप कारण्यात आले.
पाचोरा स्थानाकाच्या एसटी. कर्मचाऱ्यांचा गेल्या 85 दिवसा पासून आपल्या मागण्यासाठी संप सुरु असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा निर्माण झाला होता. माणुसकीची भूमिका पार पाडत विघ्नहर्ता हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.भूषण मगर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे वाटप कारण्यात आले.. एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे ही भेट त्यांच्यासाठी मोलाची ठरली आहॆ.