राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस माध्यमातून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, यांच्या सोबत ‘शरद युवा संवाद यात्रा’

0
233

 

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 7 सप्टेंबर, 2021

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस माध्यमातून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, यांच्या सोबत ‘शरद युवा संवाद यात्रा’
पाचोरा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्टेशन रोड, गुलाब डेअरी जवळील  राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाच्या परिसरात  उद्या 8 फेब्रू मंगळवार रोजी  सकाळी 10 वाजता शरद युवा संवाद यात्राचे आयोजन केले आहे. देशाचे नेते पद्मविभूषण मा. खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस माध्यमातून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, यांच्या सोबत ‘शरद युवा संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मा. आमदार दिलीपभाऊ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पाचोरा न.पा. गटनेते संजयनाना वाघ, पाचोरा विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे
पाचोरा राष्ट्रवादी कॉंग्रेस ता. अध्यक्ष विकास पाटील,शहर अध्यक्ष अझहर खान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ता. अभिजीत पवार, शहर अध्यक्ष सुदर्शन महाजन यांनी केले आहे.
या यात्रेची सुरुवात जळगांव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान मौजे आसोदा ता.जि.जळगांव येथून दि.04.फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 5 वाजता झाली ही यात्रा सर्व जळगांव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोहचत असून पाचोरा तालुक्यात दिनांक 8 फेब्रू. मंगळवार रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता पाचोरा रेल्वे स्टेशन रोडवरील गुलाब डेअरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या परिसरात पोहचणार आहे.
यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष सह सर्व आजी- माजी आमदार, सर्व सेलचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत . यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचा मानस आहे. नव्याने राजकारणात येऊ पाहणारी युवकांची संख्या लक्षणीय आहे! त्यांना राजकीय प्रक्रियेच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची ‘राष्ट्रवादी विचारांची’ व विकासात्मक दृष्टिकोन असणारी फळी महाराष्ट्रात नव्या जोमाने निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही संवाद साधणार आहोत! या शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून नव्या ऊर्जेने युवकांच्या सोबत संवाद साधणार आहेत. पाचोरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.