आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 8 सप्टेंबर, 2021
शरद संवाद यात्रेला पाचोऱ्यातून उत्सफुर्त प्रतिसाद
पाचोरा – आज रोजी पाचोरा येथे शरद संवाद यात्रा आली असताना प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख यांनी आपले विचार मांडले प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सांगितले पाहिजे. शरद पवार यांचे कार्य लोकां पर्यंत गेले पाहिजे. प्रत्येक बुथवर 10 युवकांची फळी निर्माण केली तर 2024 विधानसभेचा निकाल वेगळा लागेल. युवकांनी ट्विटर,फेसबुक यांचा उपयोग करायला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी पाचोरा येथे शरद युवा संवाद यात्राप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, योगेश देसले,मा.आ. दिलीप वाघ, रवींद्र नाना पाटील ,न. पा. गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, खलील देशमुख, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ सागर गरुड, रा. काॅं. जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अजहर खान, विलास जोशी, नगरसेवक भुषण वाघ, विकास पाटील, अशोक मोरे, बशीर बागवान, प्रकाश पाटील, दत्ता बोरसे, नाना देवरे, सिताराम पाटील, मजहर खान, रंणजीत पाटील, शेख रसूल,प्रा. माणिक पाटील, सत्तार मिस्तरी सुदाम वाघ, माजी नगरसेवक नाना देवरे,योगेशपाटील, ए बी अहिरे, सुभाष पाटील, हरून देशमुख, हेमराज पाटील, राहूल राठोड, पाचोरा युवक अध्यक्ष अभिजित पवार, मनीष बाविस्कर, यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी नियुक्त केल्या.
मनोगत व्यक्त करताना योगेश देसले यांनी आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देखील एक सूची तयार करून ती जिल्हाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्षांनी गाव पातळीवर जरी दिली आणि प्रत्येक गावांमध्ये जाऊन चार चार लोकांच्या चावडी बैठका जरी घेतला तरी संघटनेचे काम बळकट होईल असे मत व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संधी उपलब्ध करून घ्यायची असेल तरीही आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला सुवर्णसंधी आहे आपल्या सर्व युवकांनी केलं पाहिजे जास्तीत जास्त संवाद या त्यांच्या माध्यमातून आपण गावागावांमध्ये जाऊन जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा आपला सहभाग करून घेता येईल. हा प्रयत्न यानिमित्ताने केला पाहिजे , माजी आमदार दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना युवकांना संधी देण्याचं काम करणार आहोत. जास्तीत जास्त यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील तर आभार सुदर्शन सोनवणे यांनी मानले. यावेळी सागर भोसले,गणेश पाटील, योगेश शिरसाट, निलेश पाटील, राकेश सोनवणे, योगेश मिस्त्री, सय्यद तारीख मोहम्मद लकरी, वाजिद बागवान, पिंटू पाटील, ॲड भैय्या सुतार, प्रशांत साळुंखे शहरी व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.