पिंपळगाव हरेश्वर येथील नवीन वास्तूचे उद्घाटन व ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.राजेंद्र  चिंचोले यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.

0
1117

 

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 10 सप्टेंबर, 2021

पिंपळगाव हरेश्वर येथील नवीन वास्तूचे उद्घाटन व ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.राजेंद्र  चिंचोले यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार व गौरव समारंभ शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 22 रोजी सकाळी 9:30वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

  या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार दादासो उन्मेश पाटील हे असून आमदार आप्पासो किशोर पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ हे आहेत .कार्यक्रमास प्रमुख अतिथी अमोल भाऊ शिंदे ,मधुभाऊ काटे ,रत्नप्रभा पाटील हे आहेत .
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दीपस्तंभ फाउंडेशन चे  संचालक यजुर्वेंद्र महाजन व पाचोर्‍याचे प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल हे आहेत .कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, चिटणीस रवींद्र जाधव ,सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य प्रमोद महाजन मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे, शेवंताबाई नाईक ,साईदास राठोड स्वागत समिती सदस्य संजय झेरवाल, संजय पाटील ,अर्जुन सावळे, मनोज सोनवणे ,संदीप पाटील ,रणजित देशमुख ,परेश पाटील ,अर्चना चव्हाण ,मीरा पाटील, संगीता पवार यांनी केले आहे