भडगाव
भडगाव येथे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देन्यात आलेल्या घंटा गाड्या व त्यावरील चालक तथा कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालतोय असे दिसुन येतंय . भडगाव येथील श्री. मुन्ना परदेशी ‘ माझे गाव , माझा परिसर प्रतिष्ठान ‘ सचिव राहणार खोल गल्ली भडगाव . यांच्या घरी दिनांक 22/11/2020 रोजी छोटासा घरगुती कार्यक्रम होता . त्या कर्यक्रमाच्या ठिकाणी काही अन्न उरलेलं होत . ते शिळ अन्न जनावरांना टाकल्यास त्यांचे आरोग्य धोक्यात येईल . म्हणून ते अन्न श्री. मुन्ना परदेशी यांनी अन्न घंटा गाडीत टाकन्याचे ठरवले. कोरोनाजन्य परिस्थिती काळात दुर्गंधीचा फैलाव होऊ नये . यासाठी त्यांनी ते उरलेलं अन्न नगर परिषद भडगाव कडून येणाऱ्या घंटा ओला कचऱ्यात टाकन्याचे ठरवले होते . घंटा गाडीतील धव्नी फितित स्पष्ट मांडन्यात आले आहे की उरलेलं अन्न , फळ, भाजीपाल्याची साल हिरव्या डब्यात म्हणजेच ओला कचऱ्यात टाकने . परंतु सदर घंटा गाडीचालक व कर्मचारी यांनी ते उरलेले अन्न घेण्यास नकार दिला . म्हणून श्री. मुन्ना परदेशी यांनी कचरा कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क साधला . परंतु त्यांनी सदर ओला कचरा आम्ही बाळदरोड येथे संकल केंद्र उभारले आहे तेथे तुम्हाला जाऊन ओला कचरा टाकावा लागेल असे उत्तर दिले . या ठिकाणी घरातील महिला वर्ग कसा जाईल ? मुन्ना परदेशी यांना नगर परिषदेतील कर्मचार्यांनी समाधानकारक असे उत्तर दिले नाही . म्हणून त्यांनी कायम स्वरूपी कचरा गाडी व त्यावरील कर्मचारी व गाडीचालक यांच्या पासुन होणाऱ्या त्रासा बाबतीत त्यांनी प्रतिष्ठानचे काही सहकारी व ते शिळ अन्न घेऊन नगरपरिषद येथे आरोग्य अधिकारी लाड साहेब व छोटू वैद्य यांना निवेदन दिले . व तसेच त्यांनी आजूबाजूच्या एरियामधील लोकांच्या पण तक्रारी जाणून घेऊन त्यांच्याही समावेश निवेदनात केला . व निवेदन पत्रावर तेथील रहिवासींच्या सह्या देखील घेतल्या . व त्यावर नगर परिषदेकडून होणाऱ्या त्रासाबाबत समस्या व्यक्त केल्या . भडगाव स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मिळालेला 48 वा नं हा नावाला न ठेवता अजून 1 नं वर कसा येईल यासाठी चांगले काम करावे व जनतेला त्रास होनार नाही याची दक्षता घ्यावी अशी कळकळीची विनंती श्री मुन्ना परदेशी यांनी नगर परिषदेला केली . भविष्यात असे काही पुन्हा घडल्यास ‘ माझे गाव, माझा परिसर ‘ प्रतिष्ठानाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला . निवेदन देतेवेळी तेथे मुन्ना परदेशी यांच्या बरोबर सोनू महाजन , शेख वकार व बाळा गायकवाड उपस्थित होते .