पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याची विष  प्राशन करून आत्महत्या

0
500

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 12 सप्टेंबर, 2021

पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याची विष  प्राशन करून आत्महत्या
पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाचणखेडा येथील कोमल नारायण महाजन (माळी) वय – ४२ यांचेवर खाजगी बँकेचे कर्ज होते. सदरचे कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत कोमल महाजन यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ११:३० वाजता त्यांचे शेतात विषारी औषध प्राशन केले. सदरचा प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता मृत्युशी झुंज देत असतांना सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मयत कोमल महाजन यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमल महाजन यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.