आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 13 सप्टेंबर, 2021प्रा. राजेंद्र चिंचोले
आजच्या टीव्हीच्या युगात ही बरीच माणसं आजही रेडीओच्या प्रेमात.जुन्या गोष्टींना उजाळा देण्याला ते प्राधान्य देतात
(अनिल आबा येवले) शब्दांकन
एक जुनी म्हण आहे जुनं ते सोनं तसंच रेडिओ हा जुन्या काळातला असूनही आजही रेडीओ आकाशवाणीचा चाहता वर्ग आहे.
आजच्या युगात माणूस वेगवेगळे शोध लावत असून धर्तीवर रोज नवीन नवीन शोध च्या बातम्या आपण ऐकत असतो पूर्वी लोकांना करमणूक साठी काहीच साधन नव्हते फक्त रेडिओ होता त्या माध्यमातून लोकांना बातम्या व मधुर गाणे ऐकायला भेटत होत जशीजशी माणसाची प्रगती होत गेली तशी तशी नवीन शोध लागू लागले त्यामध्ये सिनेमा टॉकीज त्यानंतर टीव्ही व्हिडिओ याकडे लोक आकर्षित होत गेले त्यामुळे रेडिओवर सर्वांचे दुर्लक्ष केले पण त्याला आमचे पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील एक सामाजिक कार्यकर्ते व एडवोकेट अण्णासाहेब भोईटे मात्र याला अपवाद आहे आजही ते पूर्वी पासून तर आजपर्यंत आपल्या घरात रोज रेडिओचा वापर करतात त्या माध्यमातून रोज सकाळी व संध्याकाळी मधुर गाणी व बातम्या ऐकत असतात श्री अण्णासाहेब भोईटे पेशाने वकील असून एक सामान्य कार्यकर्ता असून गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याकरता सदैव प्रयत्न करतात सामाजिक क्षेत्रातील कुठलेही काम असो ते अग्रक्रमाने सोडत असतात गेल्या पन्नास वर्षापासून गोराडखेडा ते पाचोरा रोज आपला वकिली व्यवसाय करण्या करता कोर्टात येत असतात आजही ते कुठलेही वाहन न वापरता पायी फिरत असतात गोराडखेडा येथून येताना किंवा जाताना त्यांना कोणी प्रेमाने बसविले तर बसतात नाही तर आपली पायी चालून घरापर्यंत पोहोचतात त्यांचे राहणीमान साधे व सरळ आहे सर्व विषयावर चांगला अभ्यास असून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे राजकारणातील सर्वपक्षीय संबंध असून पतसंस्थे वर डायरेक्टर असून त्यांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आज व्हाट्सअप चा जमाना असून सुद्धा अण्णा रेडिओचे प्रेमी आहे आज रेडिओ दिवस असून खरा रेडिओ दिवस श्री अण्णासाहेब भोईटे मनापासून करतात अण्णांचा आदर्श इतरांनी घ्यावा व पूर्वीप्रमाणे प्रत्येक घरात रेडिओ असलाच पाहिजे अशी संकल्पना केली पाहिजे कारण रेडिओमध्ये स्वर्गीय लता मंगेशकर आशा भोसले ,कीशोर कुमार, रफी,मन्नाडे,महेंद्र कपूर अशा अनेक गायकांचे मधुर आवाजातील सदाबहार अवीट गोडीची गाणी ऐकायचा आनंद मिळतो..!अन अनेक चर्चा सत्राद्वारे ज्ञानात भर पडते.जीवनाशी निगडित सर्वच विषया संबंधी माहीती व ज्ञान मिळते.
करमणूक व ज्ञान असे दोन्ही हेतू आकाशवाणी चे कार्यक्रमातून साध्य होतात.
अण्णांना… रेडिओची आवड का?
त्यांच्या मते ,टीव्हीसमोर बसून राहावे लागते हातातली कामे सोडावी लागतात रेडिओ चे कार्यक्रम आपल्याला स्वतःला स्वतःची कामे करीत असताना आपण ऐकू शकतो.
टीव्ही माध्यम माणसाची विचार क्षमता कमी करते टीव्ही पाहत असताना जे आपण पाहतो ते कितपत खरं खोटे याचा माणूस विचार करू शकत नाही रेडिओ चा कार्यक्रम सुरू असताना तुम्ही विचार करू शकता रेडिओ विचार शक्ती मारत नाही. रेडिओ चा वापर हा खेड्यापाड्यात व शहरात आजही होत असून आज त्याचा वापर एफ एम च्या माध्यमातून होत असून वर्तमान काळ भूतकाळ व भविष्यकाळात रेडिओ चा वापर होत राहील असे सुविचार श्री एडवोकेट अण्णासाहेब भोईटे यांचे आहे
त्यामुळे आज रोजी रेडिओ चा वाढदिवस असून रेडिओ प्रेमींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आज रोजी रेडिओचा जागतिक दिवस!
Home Uncategorized आजच्या टीव्हीच्या युगात ही बरीच माणसं आजही रेडीओच्या प्रेमात.जुन्या गोष्टींना उजाळा देण्याला...