सालाबादप्रमाणे होणारी रथाची यात्रा रद्द ?

0
449

पाचोरा

पाचोरा येथील श्री बालाजी महाराज यांची रथाची यात्रा दरवर्षी कार्तिक शुक्ल 14 चतुर्दशी रोजी आयोजित करण्यात येत असते. परंतु कोरोना विषयाचा वाढता प्रभाव लक्षात घेता व covid-19 बाबत शासनाचे निर्देशानुसार या वर्षी दिनांक 29/11/2020 रविवार रोजी येणारी रथाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दिवशी यात्रेचे नियोजन नसल्याने कोणत्याही प्रकारची दुकाने अथवा फिरत्या विक्रेत्यांनी स्टॉल लावु नये अशी विनंती श्री बालाजी मंदिर संस्थान, पाचोरा यांचेमार्फत करण्यात येत आहे . दिनांक 29/11/2020 रोजी नेहमीप्रमाणे रथाची सजावट करण्यात येणार असून श्री बालाजी महाराज पूजन व रथाची पूजा इत्यादी धार्मिक विधी श्री बालाजी मंदिराचा परिसरात सोशल डिस्टंगसिंगचे पालन करून करण्यात येणार आहेत. तरी भाविकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे अशी विनंती पितांबर पांडू पाटील, श्री विश्वासराव राजाराम पाटील, श्री यशवंत राजाराम पाटील व विश्वस्त श्री बालाजी मंदिर संस्थान पाचोरा व सयाजी पाटील परिवार यांच्यामार्फत करण्यात येत आहे.