अखेर पाचोरा शहरातील बाजारपेठेने  घेतला मोकळा श्वास

0
352

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 16 सप्टेंबर, 2021
अखेर पाचोरा शहरातील बाजारपेठेने  घेतला मोकळा श्वास
पाचोरा शहरात अतिक्रमणावर पालिकेचा हतोडा
पाचोरा  शहरात प्रचंड प्रमाणात शहराच्या सर्वच  मुख्य रहदारीच्या रस्त्यावर आणि मुख्य बाजारपेठेच्या मोक्यांच्या जागेवर, चौका चौकात हातगाडी आणि भाजीपाला-फळविक्री करणाऱ्या व अन्य लहान मोठया व्यवसायीकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दुकाने लावून अतिक्रमण केले होते.  विशेष करून हातगाडी व्यवसायीकांंची दुकाने रहदारीला आणि व्यापारी संकुलातील दुकांदारांना अडथळा ठरत होती.  भर रस्त्यात हातगाडी  लावून  रहदारीचे कोंडी  समस्या निर्माण होत असल्याने  यातूनच वाद- विवाद होणे, अपघात होणे नित्याचे झाले होते.  ज्या व्यवसायिकांनी लाखो रुपये भरून शॉपिंग कॉमप्लेक्स मध्ये आपले व्यवसाय सुरू केले होते त्या मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानावर जाण्यासाठी ग्राहकांना रस्ता सापडत नव्हता. या कारणांमुळे मोठ्या व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.  तसेच या अतिक्रमणामुळे शहराच्या सौंदर्याचे तीनतेरा वाजले होते. म्हणून या अतिक्रमणा बाबत सतत तक्रारी आणि नाराजी  वाढली होती. हा सर्व प्रकार राजकीय लाचारीतून वाढला अश्या चर्चा आहे .?  याची गंभीर दखल घेत मागील आठवड्यात नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची भुमिका घेऊन अतिक्रमण धारकांना  नोटीसा बजावल्या होत्या. दि.१४ रोजी पोलिस बंदोबस्तात  मुख्याधिकारी यांनी पाचोरा नगरपालिकेच्या वतीने धडक मोहीम राबवून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात  दोन दिवसां  पासून अतिक्रमण काढले जात आहे . सद्यस्थितीत नगरपालिकेचा कारभार व अधिकार मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना असल्याने या अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणत्याही राजकीय  हस्तक्षेप दिसून येत नाही. किंवा प्रतिसाद मिळत नाही. अतिक्रमण काढतांना नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी आपली कर्तव्य कठोर भूमिका कायम ठेऊन धडक मोहीम सुरुच ठेवली आहे. त्यांच्या कारवाई बदल  कौतुकास्पद चर्चा आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत बाहेरपूरा भागातील मच्छीबाजार परिसरा पासुन प्रचंड फौजफाटयासह जे.सी.बी. द्वारे अतिक्रमणे काढण्यास सुरवात झाली .असली तरी टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणे हटवणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी प्रसारमाध्यमांंना  सांगितले.  अनेकांनी लिलावात गाळे घेतले आहेत. परंतु काहींची अद्यापही पूर्ण जमा नाही. अनेकांची भाडे व घरपट्टी थकीत असल्याने या वसुलीसाठी कठोर पावले उचलून उर्वरीत डिपॉझिट व थकीत भाडे वसुली करण्यासाठी एकमात्र  प्रभावी अभियान राबविण्यात येणार असल्याचे समजते.?
भाजी मार्केटच्या ओट्यांचे लिलाव झालेले आहेत. मात्र ज्यांनी हे ओटे लिलावात घेतलेले आहे. त्यांनी आपली दुकाने  ओट्यावर दुकाने न लावता दुसरीकडे अतिक्रमण करून आपला व्यवसाय  व दुसरीकडे हे ओटे भाड्याने देऊन भाड्यापोटी दररोज हजार ते पंधराशे रुपये भाडे कमावत आहेत. तर दुसरीकडे  हातगाडी वाल्यांना स्वतंत्र हॉकर्स झोन दिलेला असतांनाही हे हातगाडीवर व्यवसाय करणारे हॉकर्स झोन सोडून मनाला पटेल तेथे भररस्त्यावर, मुख्य वर्दळीच्या हातगाड्या उभ्या करुन रहदारीला अडथळा निर्माण करतात. हा गैरप्रकार नगरपालिकेच्या लक्षात आला असून पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन यांच्या वरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी शोभाताई बावीस्कर यांनी सांगीतले.
तसेच बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरातील भाजीपाला, फळ विक्रेत्यांना आपली अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी स्वतंत्र बैठक घेऊन सूचित केले. या सुचनेनुसार या परिसरातील विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपापली अतिक्रमणे काढून घेतल्याने पालिका जीनचा परिसर काही प्रमाणात मोकळा झालेला आहे. बाहेरपूरा भागातील मच्छी बाजारा पासून कच्ची व पक्की अतिक्रमणे काढण्याला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. यासाठी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर, पालिकेचे सुमारे ५० कर्मचारी ,पोलीस मुख्यालय जळगाव, पाचोरा, पहूर व पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांचा फौजफाटा तैनात करून अतिक्रमणे काढण्यात आली. काहींनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली तर आठवडे बाजारातील काही अतिक्रमण धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
त्यानंतर उर्वरित अतिक्रमणा संदर्भात पालिका प्रशासन निर्णय घेणार असून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर अधिक्षक मराठे यांनी स्वतः उपस्थिती देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. तसेच यापुढेही टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेचे नागरिकां कडून कौतुक होत आहे.दि.१५ रोजी मुख्याधिकारी श्रीमती बाविस्कर यांनी भडगावरोड वर मोर्चा वळवून या मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेल्या अतिक्रमनाला आहि प्रमाणात अंकुश लावला आहे.