पाचोरा शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर

0
410

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि.18/2/2022
पाचोरा शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाचोरा शहर कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून प्रवीण विश्वनाथ पाटील यांची शहराध्यक्षपदी तर कुणाल कृष्णराव पाटील यांची शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महासंघाची पाचोरा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत अ. भा. मराठा महासंघ पाचोरा शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील तर सरचिटणीस पदी कुणाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष प्रा. साहेबराव डी. थोरात, सुनील देशमुख, तालुका सरचिटणीस राहुल आप्पा बोरसे तालुका चिटणीस चंद्रकांत पाटील, तालुका कार्यकारिणीचे सदस्य प्रदीप सोमवांशी, कैलास पाटील, पत्रकार नागराज पाटील, पत्रकार गणेश शिंदे व राजे संभाजी फाऊंडेशनचे आधारस्तंभ भूषण देशमुख, राजेंद्र पाटील, गणेश पाटील उपस्थित होते.
प्रवीण पाटील यांच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी खालीलप्रमाणे –
कुणाल कृष्णराव पाटील शहर सरचिटणीस
अमोल ज्ञानेश्वर पाटील- कार्याध्यक्ष
अक्षय संजय देशमुख-उपाध्यक्ष
सागर प्रकाश भोसले-उपाध्यक्ष
मनोज एकनाथ पाटील-चिटणीस
निखिल अरुण महाजन-चिटणीस,
राहुल (प्रेमराज) दीपक पाटील खजिनदार
सचिन अशोक पाटील -संघटक
चेतन बाळकृष्ण पाटील -संघटक
सागर चंद्रकांत पवार-सहसंघटक
सचिन संतोष पाटील -सहसंघटक
नितीन भिकन पाटील -प्रसिद्धी प्रमुख
राहुल बाबुलाल पाटील-समन्वयक
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.