पाचोरा येथील पोलीस आजतक” या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे नाशिक येथे रेल्वेच्या धक्याने अकस्मात मृत्यू

0
713

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि.18/2/2022
पाचोरा येथील पोलीस आजतक” या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे नाशिक येथे रेल्वेच्या धक्याने अकस्मात मृत्यू
पाचोरा, प्रतिनिधी !
पाचोरा येथील भडगाव रोडवरील दत्त कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या व “पोलीस आजतक” या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे (वय – ४५) यांचा दि. १७ रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजच्या दरम्यान नाशिकरोड येथे रेल्वेच्या धक्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रविण दिवटे हे गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे आपल्या कंटूंबियासह वास्तव्यास गेले होते. यांचे पाच्छात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार असून त्यांचे मृत्यू प्रकरणी नाशिक येथील रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचेवर आज दि. १८ फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाचोरा येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक रामजी धनजी दिवटे यांचे मोठे चिरंजीव व युनियन बँकचे कर्मचारी संदिप दिवटे यांचे मोठे बंधू होत.