पाचोरा मोंडाळा रोडवर दोन दुचाकीत समोरा समोर धडक एक जण जागीच ठार तर तिनं गंभीर

0
2749

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि.१९/२/२०२२
पाचोरा मोंडाळा रोडवर दोन दुचाकीत समोरा समोर धडक एक जण जागीच ठार तर तिनं गंभीर जखमी
पाचोरा मोंडाळा रोड म्हसोबा मंदिर येथे दि,१९ रोजी रात्री साडे आठ वाजता दोन दुचाकीत सामोरा समोर जोरदार धडक एम.एच.१९,डी.ई.३२९६ हीरो होंडा.दुसरी एम.एच.२१.ए.ए,२५३९ ह्या दोन दुचाकीत जोरदार धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सागर विजय परदेशी (वय २८ रा सातगाव डोंगरी यांचा जागीच मृत्यू झाला) तर यमराज धर्मराज पाटील रा.आंतुर्ली, गणेश भीमराव पाटील रा.आंतुर्ली,
गोपाल हारसिंग पाटील रा.आंतुर्ली, हे तीन गंभीर जखमी असुन त्यांना पाचोरा विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केले आहे. हा अपघात इतका गंभीर होता की त्यात दोन्ही वाहनांचा नुकसान झाला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहे.