पाचोरा शहरात आजपासून “आमदार चषक” खुली कबड्डी स्पर्धेचे आयोजन

0
790

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी 

दि,२०/२/२०२२

पाचोरा येथे आजपासून “आमदार चषक” खुली कबड्डी स्पर्धेचे आयोजन
पाचोरा, प्रतिनिधी !
पाचोरा शहरातील मानसिंगका काॅर्नर, रिक्षा स्टाॅपजवळ आज दि. २० फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजे पासून क्रिडा क्रांती कबड्डी मंडळातर्फे “आमदार चषक” खुला गट जिल्हा कबड्डी असोसिएशन स्पर्धेस प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी अध्यक्ष म्हणून पोलिस उपअधीक्षक भारत काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार दिलीप वाघ, न. पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील), मा. नगरसेवक बशीर बागवान, भुषण वाघ, सुरेश देवरे, एम. एस. पी. बिडकाॅन गृपचे संचालक मनोज पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, क्रिडा संचालक मालोजीराव भोसले, मनोहर पाटील, मा. कबड्डी खेळाडू तथा पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, उल्हास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत विजयी संघास प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये व तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये देण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कबड्डी स्पर्धांचा लाभ क्रिडाप्रेमींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.