तारखेडा “खुर्द”  येथे जगदंबा माता देवीची यात्रे निमित्त बैलगाडी शर्यत (शामिगोंडा) उत्साहात पार पडला_

0
1125

तारखेडा “खुर्द”  येथे जगदंबा माता देवीची यात्रे निमित्त बैलगाडी शर्यत (शामिगोंडा) उत्साहात पार पडला 
     पाचोरा तालुक्यातील तारखेडा “खु” येथिल जगदंबा माता देवीची यात्रा उत्सवला इतिहासिक वारसा आहे. दि.१६ फेब्रुवारीला देवीची यात्रा आणि १२ गाड्या ओडल्या गेल्या,  १८ फेब्रुवारीला  बैलगाडी शर्यतिचा (शामिगोंडा) भव्य दिव्य असा सामना रंगला,या सामन्याचे प्रथम येणाऱ्याला पाचोरा काँग्रेस शहराध्यक्ष अँड.अमजद पठाण यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केले. व द्वितीय येणाऱ्याला मा.ग्रा.पं. सदस्य.नासेर खा लालखा पठाण यांचा स्मरणार्थ व सर्व ग्रा. पं सदस्य यांचा तर्फे बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले या वर्षी यात्रेचा निमित्त गावकरी व येणाऱ्या श्रद्धाळू लोकांना मध्ये अती उत्साह होता.
      यात्रे निमित्त जगदंबा देवीचा मंदिराला रंग रंगोटी करून लायटिंग व फुलांनी सजविण्यात आले होते. तारखेडा “खु” ग्रामपंचायतचे नाव नियुक्त सरपंच पती श्री. नवल गुजर, उप – सरपंच श्री. डी.के. पाटील, सदस्य. संजय गोसावी, पिंटू मराठे, राजेंद्र पाटील, सुनील नाईक, तसेच गावातील वरिष्ठ व गावकऱ्यांनी   अनमोल सहकार्य केले.