आरोग्यदुत न्युज रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी दि.23/2/2022 ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा.( तेली समाज मंडळ पाचोरा ) धरणगाव शहरातील एका भागात संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय – ६२) या संशयित आरोपी चंदुलाल मराठे याने सहा वर्षाच्य अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची लक्षात येताच पीडीत मुलीच्या आई व वडील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदुलाल मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. धरणगांव येथे दि.२०/०२/२०२२ रोजी ६ वर्षाची अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याची दुदैवी घटना घडली असून सदरचा प्रकार घृणास्पद व माणूसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेचा आम्ही तिव्र शब्दात जाहिर निषेध करत आहोत.१) या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आलेली असून कठोर शासन करण्यात यावी. पाचोरा शहर व तेली समाज मंडळ यांच्या मागण्या असे आहेत. २) पीडीत मुलीचे कुटूंबीयाना नियमाप्रमाणे अर्थिक सहाय्य देण्यात यावे ३) पीडीत मुलीचे कुटूंबीयांना संरक्षण देण्यात यावे. ४) सदरचा खटला जलद न्यायालयत चालविण्यात यावा. यावेळी उपस्थित पाचोरा तेली समाज या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत आहे. प्रांत अधिकारी पाचोरा. तहसिलदार पाचोरा. पो.स्टेशन पाचोरा. यांना निवेदन देताना तालुका अध्यक्ष..सतिष चौधरी, शहरअध्यक्ष.. नारायण चौधरी, उपाध्यक्ष..उत्तम चौधरी, सचिव..शांताराम चौधरी, सहसचिव..शरद चौधरी, प्रकाश चौधरी, मोतीलाल चौधरी, प्रा.सी.एन.चौधरी, भालचंद्र चौधरी, संजय चौधरी, पंडीत चौधरी, आदी उपस्थित होते.