जळगावत सेवानिवृत्ती अधिकारी कडे धाडसी चोरी रामांनद नगर पोस्टे ला गुन्हा दाखल

0
751

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दिनांक – 23 फेब्रुवारी, 2022

जळगावत सेवानिवृत्ती अधिकारी कडे धाडसी चोरी
रामांनद नगर पोस्टे ला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मानराज पार्क लगत असलेल्या दांडेकर नगर परीसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकारी कडे चोरट्यांनी डल्ला मारला.
जळगाव शहरात चोरी प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रामांनद पोलीस स्टेशन च्या हद्दीत गेल्या महिन्यापासून भुरटय़ा चोर्‍यांचे प्रमाणात वाढ झाली आहे बहुतांश गुन्हे कमी रक्कम ची चोरी असल्याने दाखल होत नाही. येथील डीबी ला चोरांनी आव्हान दिले आहे. दि. २० ते २१ च्या रात्री च्या दरम्यान दांडेकर नगर भागातील कापुस फेडरेशनचे सेवानिवृत्ती अधिकारी अरविंद भास्कर निकम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी जवळपास सत्तर हजाराचा माल लंपास केला. चोरटय़ांनी सोने, चांदी च्या वस्तू सह टिव्ही देखील नेला आहे. अरविंद निकम यांच्या फिर्यादीवरून पो. स्टे. भाग ५ गु. र. ४०/२०२२ भा. द. वी. ३८०,४५४,४५७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच रामांनद नगर पोलीस स्टेशन चे प्रभारी पो. नि. विजय शिंदे यांनी तपास तात्काळ सुरू करु डीबी ची यंत्रणा कामाला लागली. फिंगर प्रिंट विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन डोगंरे पो कॉ. सचिन चौधरी यांना चोरटय़ांचे ठसे मिळाले आहे. त्यामुळे चोरी तपास लवकर लागेल असा पोलिसांना विश्वास आहे