आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दि, २६/२/२०२२
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने. २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव येथील गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रूग्णालय यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नगरदेवळा सरदार एस. के. पवार हायस्कूलमध्ये येथे हे शिबीर होणार आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर व माजी आ.दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबीरात डायबिटीस, थायरॉईड, लहान मुलांचे आजार, महीलांच्या गर्भ पिशवीचे आजार, मासिक पाळी समस्या, स्तनांचे, पोटाचे, आतड्यांचे आजार, मूळव्याध, घेरी येणे, अशक्तपणा, किडनी, डोळे, स्नायू संधीवात, गुढघे संबंधित विविध प्रकारच्या आजारांची तपासणी गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. तरी नगरदेवळा गावातील व परीसरातील ग्रामस्थांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस नगरदेवळा, बाळद गण व गट पदाधिकारी आणि गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.