आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि.२७/२/२०२२
आज दि.२७-०२-२२ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा यांच्याकडून मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी स्वाक्षरी करावी हा संदेश छत्रपती शिवाजी महाराज चौकात देण्यात आला. कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दिली व स्वाक्षरी केली त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष फहीम भाई शेख, तालुका अध्यक्ष शुभम पाटील, शहर अध्यक्ष ऋषीकेश भोई, शहर उपाध्यक्ष रोहित पाटील यश रोकडे, शहर संघटक हर्षल अहिरे ,शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदूले, चेतन चौधरी, आकाश गोसावी, दीपक गोरखा सागर भाऊ वाघ रवी बोरसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते व नागरिकांनी मराठी स्वाक्षरी करून कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.