लोकशाही दिनाचे 7 मार्च रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन तहसील कार्यालयात उपस्थित राहून मांडता येणार तक्रारी

0
104

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – २८ फेब्रुवारी, २०२२
लोकशाही दिनाचे 7 मार्च रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन
तहसील कार्यालयात उपस्थित राहून मांडता येणार तक्रारी
जळगाव, नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता दिनांक 7 मार्च, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.