युक्रेनचा विद्यार्थी पाचोर्यात परतला :कॉंग्रेस केले स्वागत

0
414

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी

दि,२/३/२०२२
युक्रेन चा विद्यार्थी पाचोर्यात परतला :कॉंग्रेस केले स्वागत
पाचोरा (प्रतिनिधी) :- युक्रेन आणि रशियन युध्दाची सुरवात झाली असून भारतीय विद्यार्थी सुखरूप परतले यात पाचोऱ्यातील सुरज शिंदे चे आगमन होताच कॉंग्रेस ने जंगी स्वागत केले
तालुक्यातील मोढांळा येथील सेवानिवृत्त सैनिक रविंद्र शिंदे यांचा मुलगा सुरज शिंदे हा एमबीबीएस च्या दुसर्‍या वर्षाला युक्रेन येथे शिक्षण घेत आहे सद्ध्या परीस्थितीत युक्रेन आणि रशियन यांच्यातील युध्दाची सुरवात झाली असून यात हजोरो विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेन येथुन येणाऱ्या सहाव्या विमानातुन सुरज शिंदे हा सुखरूप मायदेशी परतला आहे. आठ किलोमीटर अंतराचे अंतर शुन्य तापमानात पायी चालत विमानतळ गाठले होते.
मुंबई विमानतळावरून रेल्वे ने गावी आल्यावर पाचोरा रेल्वे स्थानकावर कॉंग्रेस कडुन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सुरज चे स्वागत केले. यावेळी शिवदास पाटील, बाळु पाटील, राहुल शिंदे, रवी सुरवाडे, सतिश वाकडे आदी सह सुरज चे वडील रविंद्र शिंदे आई उपस्थितीत होते.