आरोग्यदुत न्युज रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी दि, ८ मार्च २०२२ सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. ग्रीष्मा पाटील यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. गोंदेगाव येथील श्री स भु प्रशाला संस्थेतर्फे ८ मार्च रोजी महिला दिनाच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष आदरणीय योगेश दादा इंगळे शालेय समिती सदस्य सदाशिव मालपुरे सरपंच वनमाला ताई निकम सोनाली ताई इंगळे ग्रामपंचायत सदस्य रेखाताई पवार परिचारिका आव्हाळे मॅडम होत्या तसेच मुख्याध्यापक आदरणीय चितोड कर सर उपमुख्याध्यापक आदरणीय श्री माळी सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचा अध्यक्षा डॉ. ग्रीष्मा पाटील व प्रमुख पाहुण्यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले सर्व मान्यवर महिलांचे प्रशालेच्या वतीने भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदरणीय श्री तोडकर सरांनी केले प्रशालेतील महिमा सोनवणे वाघ चैताली निकिता घुले सिद्धि नेरपगार आर्या पाटील प्रांजली महाले या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे आदरणीय योगेश दादा इंगळे तसेच सरपंच वनमाला ताई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षा ताईसो. डॉ. ग्रीष्मा पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अनुभव कथन केले सर्व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे असे आवाहन केले स्त्रीशिक्षण आरोग्य यावर मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रमाचे संयोजक श्रीमती वैशाली पाटील श्रीमती वर्षा दाबके यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती अनिता वाघ यांनी केले आभार श्रीमती आशा पाटील यांनी केले