जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वंदना बरडे, (मेट्रन, नागपूर) यांचा श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सावित्री पुरस्कार देऊन गौरव

0
146

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)

दिनांक – ७ मार्च, २०२२

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वंदना बरडे, (मेट्रन, नागपूर) यांचा श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सावित्री पुरस्कार देऊन गौरव
महिला पुरुषापेक्षा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पुरूषाच्या बरोबरीने नाही तर पुढे जाऊन महिला कार्य करतात असे प्रतिपादन कोंडाजी मामा आव्हाड यांनी श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कारात केले. महिला उल्लेखनीय कार्य करत असतात फक्त त्यांना खंबीर पाठिंब्याची आवश्यकता असते असे ते म्हणाले.
शैफाली भुजबळ यांनी आपल्या मनोगतात.महिला मान सन्मान .द्यायलाच हवा.तसेच महिलांनी संकटाना न घाबरता  आव्हान स्वीकारत संकटावर मात करून यशस्वी वाटचाल करावी.असे मनोगत व्यक्त केले.
डीवायएसपी संगीता निकम यांनी आपल्या मनोगतात ,
समाज पुरूष प्रधान संस्कृतीला प्रोत्साहन देत गुन्हा करायल प्रवृत्त करतात.असे मत व्यक्त केले तसेच  घरातून चांगले संस्कार दिले तर समाजातील प्रत्येक स्त्री मानाने जगू शकेल.
यावेळी आमदार देवयानी फरांदे , मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अजय फडोळ, शैफाली भुजबळ, श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्त्या कविता कर्डक, दुध संघाचे माजी चेअरमन शिवाजी ढपेले, धनगर माझा संपादक धनंजय तानले, राष्ट्रवादीचे गटनेते शिवाजी सुपणर सोनाली खेमनर ,बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडीत वाकडे , महसुल साहाय्यक अर्चना देवरे, डीवायएसपी संगीता निकम यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संगीता पाटील यांनी तर सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी केले.