पाचोरा शिवसेनेचा भाजपावर जोरदार पलटवार

0
889

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,१६ मार्च २०२२
पाचोरा शिवसेनेचा भाजपावर जोरदार पलटवार
राज्यात महावितरण कंपनीच्या धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनात निर्णय करत आगामी तीन महिने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापू नये असा निर्णय घेऊन समस्त शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम केल्याने आनंदित झालेल्या शेतकरी बांधवांना सोबत घेत शिवसेनेच्या वतीने पाचोऱ्यात बुधवारी दुपारी ४ वाजता महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान मंगळवारी भाजपाच्या वतीने पाचोऱ्यात केलेल्या आंदोलनाला या वेळी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपाने आ.किशोर अप्पा पाटील यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरुद्ध एकेरी व शिवराळ भाषा वापरल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जशाच तसे उत्तर देत प्रतिहल्ला चढवत भाजपा पक्षांसह तालुकाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांचे विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी शिवसैनिकांनी हातात भाजपाला जाब विचारणारे विविध पोस्टर्स झळकवले.
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत मुकुंद बिल्डींकर, जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, युवा नेते सुमीत पाटील, जिल्हा उपप्रमुख ऍड अभय पाटील, यांनी भाषण करत भाजपाच्या बेगडी शेतकरी पुळक्यावर टीकास्र सोडले.तसेच यावेळी चौकात पाचोरा मतदार संघाचा झालेला विकास बघू न शकणाऱ्या भाजपा साठी चष्मा ठेवण्यात आले होते
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील रावसाहेब पाटील दीपक सिंग राजपूत संजय पाटील युवा रमेश बाफना माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, माजी नगरसेवक डॉक्टर भरत पाटील बाप्पू हटकर दादा भाऊ चौधरी प्रवीण ब्राम्हणे रमेश पाटील डॉक्टर शेखर पाटील जितेंद्र पेंढारकर सुधीर पाटील संदीप राजे पाटील सागर पाटील वैभव राजपूत भूषण पेंढारकर सोनू परदेशी राजेंद्र पाटील शिवाजी ठाकूर भागवत कोष्टी गोरख महाजन सागर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते