कु.डॉ.वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पी.एच.डी. केल्याने व गरुड झेप स्पोर्ट्स अकॅडमी व सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन मधील विद्यार्थ्यांनी कराटे मध्ये कलर बेल्ट प्राप्त केल्याबद्दल गौरव

0
342

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,१६ मार्च २०२२
कु.डॉ.वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पी.एच.डी. केल्याने व गरुड झेप स्पोर्ट्स अकॅडमी व सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन मधील विद्यार्थ्यांनी कराटे मध्ये कलर बेल्ट प्राप्त केल्याबद्दल गौरव
पाचोरा -शहरातील रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक &पाचोरा न.पा.माजी ऑक्ट्राय इन्स्पेक्टर स्व.दामोदर लोटन महाजन यांची नात ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक संदिप दा.महाजन &पाचोरा श्री गो .से .हायस्कूल च्या इंग्रजी विषयाच्या उप -शिक्षिका सौ .शितल सं. महाजन यांची मोठी कन्या कु.डॉ .वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून गणितात (A+) पदवी तरM.sc (A+) तसेच B.Ed(A++)
यश प्राप्त करून गणित विषयात तिने J.J.T.U.
येथून certain Investigation On Algebraic Structure Of Groups And Rings या विषयात संशोधन करून वयाच्या 26 व्या वर्षी Ph.D.प्राप्त केली .गणित विषयात पाचोरा शहर व तालुक्यातून प्रथम तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Doctorate Ph.D प्राप्त करणारी पहिली व्यक्ती ठरली आहे .कु.डॉ.वैष्णवी हल्ली पाचोरा येथील श्री शेठ एम.एम.कॉलेज मध्ये सिनियर कॉलेजला गेल्या तीन वर्षापासून गणित विभागाचे HOD म्हणून कार्यभार सांभाळत आहे.
तिच्या या यशाबद्दल व कराटे असोसिएशन चे विध्यार्थी -विद्यार्थिनींनी कराटे कलर बेल्ट प्राप्त केल्याबद्दल पाचोरा पो.स्टे. च्या पी.एस. आय.विजया वसावे मॅडम ,शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालिका बालरोग तज्ञ सौ .डॉ .प्रीतिताई मगर ,प्रसिद्ध व्याख्याते सचिन देवरे सर ,यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर सेन्साई -प्रकाश निकुंभ सर ,राजेंद्र सु .पाटील ,रणजित पाटील ,मधुसूदन पाटील ,योगेश चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेम्पाई-प्रवीण मोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश निकुंभ सर यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले .