जळगाव- एरंडोल तालुक्यात एका स्टॅम्प वेंडरकडून शासन व जनता यांची फसवणूक

0
1070

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, २२ मार्च २०२२
जळगाव- एरंडोल तालुक्यात एका स्टॅम्प वेंडरकडून शासन व जनता यांची फसवणूक करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे ह्या स्टॅम्प वेंडराला राजकिय पाठबळ असल्याने त्याची हिम्मत मोठ्या प्रमाणावर वाढल्याची ही चर्चा आहे. अनेकदा ह्या महाशयाचे असे प्रकार चव्हाट्यावर येऊन अन् विशेष म्हणजे शासकीय अधिकार्‍यांच्याही लक्षात येऊन देखील अधिकारी मूग गिळून आहेत ही आश्चर्याची बाब आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांचाही अशा प्रकरणात सहभाग असल्याचे आता उघडपणे जनतेत बोलले जात आहे. तळे चाखणार्‍यांना पाणी चाखण्याचा नक्कीच अधिकार आहे. पण आता तळेच चाखले जात असेल तर याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
काही वर्षापूर्वी या तथाकथित राजकीय वलय असणाऱ्या स्टॅम्प वेंडरकडून एक बोगस खरेदी खत करण्यात आले. हा मुद्दा राजकीय देखील बनला. उघडपणे त्यावर काही राजकीय नेत्यांनी आरोपही केले. वृत्तपत्रात रकानेच्या रकाने देखील छापून आले. तरी देखील अधिकाऱ्यांनी साधी चौकशी करून सत्यता तपासण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या महाशयांची हिम्मत बळावत गेली.
त्याचप्रमाणे विधवा महिलांना दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनेतही नवरा हयात असतांना त्यांना विधवा लाभाच्या योजनेचा फायदा या तथाकथित स्टॅम्प व्हेंडर सह इतरही स्टॅम्प वेंडर यांनी मिळवून देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यात काही स्टॅम्प वेंडर वर कारवाई देखील झाली. काहींचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले होते. मात्र या तथाकथित बनावट दस्तऐवज तयार करण्यात माहीर असलेल्या व राजकीय वलय असलेल्या स्टॅम्प वेंडर वर कुठलीही कारवाई झाली नाही की लायसन्स रद्द झाले नाही. मध्यंतरी अजून एका दस्तऐवजात महिला जिवंत असताना तिला मृत दाखवून बनावट दस्तऐवज करण्यात आल्याची घटनाही उजेडात आली होती. त्याचप्रमाणे खडकेसिम येथील देखील एका बनावट दस्तऐवज प्रकरणात याच महाशयांची कलाकारी उघडकीस आली होती. त्यामुळे हे  प्रकरण चांगलेच गाजले होते.
नुकतेच सद्यस्थितीत चक्क एका प्राध्यापकाची 37 लाखात फसवणूक झाल्याची घटना उजेडात आली आहे. ज्यात प्राध्यापकाच्या तक्रारी वरून गून्हा दाखल झाला आहे. सदतीस लाखांत फसवणूक करण्यात आली त्यातही दस्तऐवज तयार करणारे स्टॅम्प व्हेंडर महाशयांचा  संबंध असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे दुसरी बोगसगिरी अशी की, या गुन्ह्यात  आरोपी म्हणून ज्याचे स्टॅम्प वेंडर म्हणून नाव दर्शवण्यात आले आहे. तो मुळात स्टॅम्प वेंडर नसून मूळ बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सराईत स्टॅम्प व्हेंडर चे नाव राजकीय दबावापोटी वगळून त्याच्या कारकुनाला स्टॅम्प वेंडर म्हणून दाखविण्यात आल्याचेही कळते. म्हणजे प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करण्यात सदरचा स्टॅम्प वेंडर किती माहीर आहे व त्याचा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर किती प्रमाणात वाढला आहे यावरून दिसून येते.
विशेष म्हणजे प्रशासनाला माहीत असतानाही या गोष्टींची खातरजमा न करता  गुन्हा दाखल होतोच कसा? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
तसेच हे महाशय जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या पदावर असताना त्याने जवळपास तब्बल तीन कोटींची कामे न करताच बनावट बिले सादर करून निधी लाटून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार  एका विश्वसनीय व्यक्तीकडून कळाला.  हे सगळे पुराव्यानिशी कागदपत्र गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याचाही भांडाफोड होणार असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले.

एरंडोल तालुक्यातही प्रकटणार प्रती सोमय्या
या स्टँप वेंडर कम राजकिय नेत्याच्या काळया कर्तृत्वाच्या लीला शिशुपालागत शंभरी भरल्याने चव्हाट्यावर आणून गुन्हा दाखल होईपर्यंत लढा देण्यासाठी सबळ पुरावे व त्यांची जमवाजमव सुरू असल्याचे एकाने सांगीतले.त्याने या स्टँप वेंडरने स्वभावाच्या मिठीच्छुरीच्या हत्त्याराने भ्रष्ट कारभाराच्या कोट्यवधींच्या केलेल्या काळया कर्तृत्वाच्या लीला लवकरच जनतेसमोर मांडण्यासाठी एरंडोल तालुक्यात एक प्रती सोमय्या तयार झाल्याचे संबंधित व्यक्तीच्या पुरावे गोळा करण्याच्या लगाबगीवरून व बोलताना व्यक्त होणाऱ्या भावनेतून दिसून आले.
बघुया हा प्रती सोमया यात कितपत यशस्वी होतो ते. याबाबतीत क्रमाक्रमाने आम्ही त्यासंबंधीचे हितंभुत वृत आपल्या पर्यंत नक्कीचं पोहचवू. सध्या इतकंच!