धर्मरथ फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे आदर्श शिक्षक म्हणून गणेश नारायण पाटील सर यांचा गौरव

0
559

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, २३ मार्च २०२२
धर्मरथ फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे आदर्श शिक्षक म्हणून गणेश नारायण पाटील सर यांचा गौरव
प्रभावी व्यक्तिमत्व शिस्तप्रिय कुशाग्र विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख असलेले श्री गणेश नारायण पाटील (क्रीडा शिक्षक) बांबरुड राणीचे हे गेल्या २३ वर्षांपासून बांबरुड या ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करून विभाग व राज्य स्तरावर नेले आजवर असंख्य सुसंस्कारित विद्यार्थी त्यांनी घडविले तसेच त्यांचे कित्येक विद्यार्थी आज राजकीय सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर आहेत अनेक विद्यार्थी पोलिस, आर्मी, व प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन धर्मरथ फाउंडेशन ने त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार व गौरव करून सन्मानीत केले आपल्या क्षेत्रातील जडण-घडण मध्ये व प्रचार प्रसारात आपला मोलाचा वाटा घेऊन त्याचे श्रेय स्वतःकडे न घेता निरपेक्ष वृत्तीने फक्त समाजाची जबाबदारी पार पाडत क्षेत्रातील युवकांचा त्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी आपल्या कामाची पावती म्हणून धर्मरथ फाउंडेशनने त्यांना पुरस्कार प्रदान केले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व माजी मंत्री गुलाबराव देवकर पिटीसी संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप वाघ चेअरमन संजय वाघ,पंचायत समिती सदस्य ललित वाघ, श्रीमती तडवी ताई, उपसरपंच मनोज वाघ, इतर मान्यवर व शिक्षक उपस्थित होते नातेवाईक समाज बांधव व मित्र परिवार यांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले