कुऱ्हाड येथे शामी गोंडा स्पर्धा उत्साहात संपन्न

0
453

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, २२ मार्च २०२२
कुऱ्हाड येथे शामी गोंडा स्पर्धा उत्साहात संपन्न
कुऱ्हाड तालुका पाचोरा- येथे काल शिवजयंतीनिमित्त बैल जोडी चा शामि गोंडा अर्थात शंकर पट स्पर्धा भरविण्यात आली होती. कुऱ्हाड खुर्द येथील शिवसेना व युवासेना ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जळगाव जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातून त्यात अकोला, खामगाव ,मालेगाव, सिल्लोड ,धुळे व औरंगाबाद या ठिकाणाहून बैलजोडी स्पर्धकांनी भाग घेतला होता.तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन माा. जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत, विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ. सागर दादा गरुड, आंबेवडगाव चे विजय राठोड ,शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण भाऊ पाटील, सरपंच कैलास बापू भगत व उपस्थित मान्यवरांनी केले यावेळी सर्व स्पर्धक बैल मालकांनी आपल्या बैलजोडीच्या कलागुणांचे प्रदर्शन केले. यात नानेगाव ता.सिलोड येथील रफिक मिस्तरी या इसमाची बैलजोडी अवघ्या सहा सेकंदात अंतर पार करून सोळा हजाराचे प्रथम बक्षीस मिळविले. एकूण पन्नास बैलजोडी मालकांनी शामी गोंडा स्पर्धेत भाग घेत एकूण पंधरा बक्षिसे आयोजकांतर्फे निवडण्यात आली. प्रथम तीन स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस देत,इतर बारा स्पर्धकांना छत्रपतींची प्रतिमा भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेला कोरोना कालखंड संपल्यानंतर शामि गोंडा स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून येत होता. शंकर पट स्पर्धा दुपारी दोन पासून ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास हिरे, बापु पाटील, महेंद्र पाटील, संभाजी पाटील,तानाजी पाटील,जनक पाटील , युवा सेना शिवसेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.