आरोग्यदूत न्यूज प्रतिनिधी
नाशिक युवराज राजपुरे
दि,२५/३/२०२२
इगतपुरी तालुका मधील टाके घोटी येथील सरपंच मच्छिंद्र दोंदे यांनी घरकुलासाठी लागणारे कागदपत्रांची पुरतता करण्यासाठी इगतपुरी पंचायत समिती लता गायकवाड यांच्याकडे मुदतवाढीसाठी केली मागणी.
इगतपुरी तालुक्यातील रमाई आवास योजने अंतर्गत घरकुले योजना राबविण्यात येणार आहे. परंतु इगतपुरी तालुक्यातील सदर घरकुलासाठी लागणारे कागपत्र हे लाभार्थ्यांना त्वरीत उपलब्ध होत नाही. कारण सदरची रमाई आवास योजने अंतर्गत आलेले घरकुल हे इगतपुरी तालुक्यातील खेडपाड्यामध्ये लवकर माहिती होत नाही. तसेच सदर लाभार्थ्याकडे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले तसेच इतर कागदपत्र हे त्वरीत उपलब्ध होत नाही. त्या मुळे ज्या लाभार्थ्याला घरकुलाची गरज आहे त्या लाभार्थ्याला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. तरी . इगतपुरी पंचायत समितीचे लता गायकवाड मॅडम कडे विनंती केली, रमाई आवास योजने अंतर्गत आलेल्या घरकुलांसाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदती मध्ये वाढ करण्यात यावी जेणे करून लाभार्थ्याला घरकुलासाठी लागणारे कागपत्र उपलब्ध करता येईल व लाभार्थी घरकुल योजने पासुन वंचित राहणार नाही.
१)गट विकास अधिकारी पंचायत समिती इगतपुरी
२)मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक
३)जिल्हाधिकारी नाशिक
४) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक
यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी यांनी DRD यांना पत्र टपाल पाठवून लवकरात लवकर मुदतवाढ देऊन व त्याचा लाभ गोरगरिबांना मिळावा .हि घोटी टाके संरपच मंच्छिद्र दोंदे यांची मागणी
Home ताज्या घडामोडी इगतपुरी तालुका मधील टाके घोटी येथील सरपंच मच्छिंद्र दोंदे यांनी घरकुलासाठी लागणारे...