एरंडोल येथील बहुचर्चित प्लॉट ,शेतजमीन घोटाळ्यात आज आरोपींचा तिसऱ्यादा जामीन फेटाळला.

0
875

आरोग्यदूत न्यूज
रईस बागवान शहर प्रतिनिधी
दि,२८ मार्च २०२२
एरंडोल येथील बहुचर्चित प्लॉट ,शेतजमीन घोटाळ्यात आज आरोपींचा तिसऱ्यादा जामीन फेटाळला.
आज एरंडोल न्यायालयात आज आरोपी आनंदा रामदास चौधरी( एरंडोल),राजेंद्र अमृत धनगर (खडके बु) दोघे इस्टेट ब्रोकर, उमेश श्रीराम पाटील डमी स्टॅम्प वेन्डर ( जवखेडेसिम)यांना सेवानिवृत्त प्राध्यापक रघुनाथ निकुंभ यांना प्लॉट व शेतजमीन विक्रीप्रकरनात आठ दिवसांपूर्वी अटक झाली होती,मंगळवारी एरंडोल न्यायालयात हजर केले असता २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती,त्या नंतर गुरुवारी धरणगाव न्यायालयात ४ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती,आज परत एरंडोल न्यायालयात आरोपींना हजर केले असता दोन दिवसांची एम. सि.आर .कोठडी सुनावण्यात आली,एरंडोल येथील बहुचर्चित ८४ लाख फसवणूक प्रकरणी आरोपींना दिलासा नाहीच, मात्र मुख्य एक राजकीय मोहरा मात्र राजकीय दबावतंत्राने आजही मोकाट फिरत आहेत कुणाच्या आशीर्वादाने अजूनही मुख्य आरोपीस अटक होत नाही या बद्दल एरंडोल शहरात चर्चाना उधाण आले आहे, सेवानिवृत्त प्राध्यापकास मात्र,न्याय मिळावा हीच जनतेची अपेक्षा आहे.