महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पाचोरा येथे गरीब आमदारांना घर घेण्यासाठी भिक मांगो आंदोलन

0
758

दि,१/४/२०२२
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील गरीब जनतेचे हाल न बघता ३०० आमदारांसाठी मोफत घरे देण्याचा मनमानी लाजिरवाणा निर्णय घेतला एकीकडे कोरोना सारख्या महा मारी मधून
देशाची व महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. अनेक उद्योग धंदे विस्कळीत झाले महाराष्ट्रातील जनतेचे अत्यंत भयानक हाल झालेत गरीब जनतेला एका वेळेचं खायला मिळेल का नाही याची गॅरंटी नाही आपल्यासारखा सामान्य माणूस गरीब माणूस लाल परी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या बसने प्रवास करतो एसटी बस चे कर्मचारी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून संपावर आहेत अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून आत्महत्या केल्या पण प्रशासनाला पाझर फुटला नाही त्याकडे लक्ष नाही. आणि आपले मुख्यमंत्री घोषणा काय करतात तीनशे आमदारांना मोफत घरं धिक्कार आहे. तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू दादा पाटील यांनी आमदारांना घरे न देता गरीब जनतेला २०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. आमदारांना घरे देण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा यांच्यातर्फे आज आमदारांच्या घरासाठी भिक मांगो आंदोलन करण्यात आले त्यावेळी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष फहीम शेख तालुका अध्यक्ष शुभम पाटील शहर अध्यक्ष ऋषिकेश भोई, प्रशांत पाटील शहर उपाध्यक्ष रोहित पाटील व यश रोकडे शहर संघटक हर्षल अहिरे शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंडुळे,दीपक गोरखा,चेतन चौधरी, आशिष चौधरी,वाल्मीक जगताप, जय मोची, दादू परदेसी,योगेश सपकाळे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या आंदोलनाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला व महाराष्ट्र सरकारचा जाहीर विरोध केला.