८ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक बोदवड तहसीलदार योगेश तोंपे यांच्यासह त्यांचा वाहन चालक, तलाठी व एका खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश  

0
707

आरोग्यदूत न्यूज
रईस बागवान प्रतिनिधी 
 १ एप्रिल २०२२
  ८ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारसह, तलाठी, वाहन चालक, व पंटर हे चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ महाराष्ट्रात उडाली आहे. बोदवड तहसीलदार योगेश तोंपे यांच्यासह त्यांचा वाहन चालक, तलाठी व एका खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश आहे. बोदवड तहसीलदारांनी अवैधरीत्या वाळू वाहतूक चालू देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी यापूर्वी २४ हजार रुपये घेतले होते तर उर्वरीत पाच हजार रुपये तहसीलदार व चालकांसाठी तर दरमहा प्रमाणे तलाठ्याने तीन हजारांची मागणी केल्याने वाळू वाहतूक करणार्‍या व्यावसायीकाने एसीबीकडे तक्रार नोंदवली.
 जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व कर्मचार्‍यांनी सापळा रचला. सुरूवातीला खाजगी पंटराने लाच रक्कम स्वीकारली व नंतर त्याच्यासह तहसीलदार, तलाठी व चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
१) योगेश्वर नागनाथराव टोंपे, वय-३२ व्यवसाय-नोकरी, तहसिलदार, तहसिल कार्यालय, बोदवड ता.बोदवड जि.जळगाव.
रा.केअर ऑफ के.जे. पाटील संताजी नगर, मु.नगर पोस्टे रोड, मुक्ताईनगर मुळ रा.शिवकृपा निवास, शारदा नगर, देगलूर, जि. नांदेड  (वर्ग -१)
२) अनिल रावजी पाटील, वय-५१ व्यवसाय -नोकरी तहसिलदार यांचे शासकीय वाहनावरील चालक, तहसिल कार्यालय, बोदवड
रा.चिखली ता.बोदवड जि.जळगाव (वर्ग ३),
३) मंगेश वासुदेव पारिसे, -३१ व्यवसाय-नोकरी तलाठी बोदवड
रा.राजा चंद्रकांत सोसायटी बोदवड ता.बोदवड जि.जळगाव (वर्ग ३)
४) शरद समाधान जगताप, वय-२५
व्यवसाय-मजुरी (खाजगी पंटर)
रा.रूप नगर, बोदवड .ता.बोदवड जि.जळगाव,        
लाचेची मागणी- आरोपी क्रं.1 व 2 यांनी स्वतःसाठी प्रथम १०,०००/-रू. व तडजोडीअंती ५,०००/-रुपये आरोपी क्रं.3 यांनी स्वतःसाठी दरमहा ३,०००/- रुपये लाचेची मागणी.
लाच स्विकारली- ८,०००/-रू.
हस्तगत रक्कम- ८,०००/-रू.
लाचेची मागणी –
दि.३०/०३/२०२२
लाच स्विकारली-
दि.०१/०४/२०२२
लाचेचे कारण –
तक्रारदार यांचे वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांचे वाळू वाहतुक करणारे ढंपर दि.२६/०३/२०२२ रोजी तहसिलदार बोदवड यांनी बोदवड तालुका हदीतील सिंधी ते सुरवाडे गावाच्या दरम्यान रात्री थांबवले व सदर ठिकाणी तहसिलदार हे वाहनात बसलेले असतांना त्यांचा चालक व सोबत असलेला त्यांचा खाजगी पंटर यांनी नियमीत हप्त्याचे २३,०००/- रुपये जागेवरच घेतले व सदर गाडी सोडण्यासाठी १०,०००/-रुपयांची लाचेची मागणी केली तसेच बोदवड तलाठी  मंगेश पारीसे यांनी सुध्दा डंपरने वाळू वाहतुक करू देणेसाठी मासिक ३००० लाच रकमेची मागणी केली त्यावरुन  दि.३०/०३/२०२२ तहसिल कार्यालय बोदवड येथे पडताळणी केली असता  दि.२६/०३/२०२२ रोजी रात्री अडविलेले वाळूचे ढंपर सोडल्याच्या मोबदल्यात  आरोपी कं.१ व २ यांनी प्रथम १०,०००/-रु व तडजोडीअंती ५,०००/-रुपयांची लाचेची मागणी केली तसेच तलाठी बोदवड यांनी सदरचे ढंपर बोदवड हदीत चालु ठेवण्याच्या मोबदल्यात ३,०००/- रु असे आरोपी  क्रं.१ व २ यांनी ५,०००/- रुपये व आरोपी क्रं.३ यांनी स्वतःसाठी ३,०००/- रुपये तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष मागणी करून आरोपी क्रं.१, २ व ३ यांचे सांगणेवरून आरोपी क्रं.४ यांनी सदरची रक्कम आरोपी क्रं.१,२,३ यांचेसाठी व स्वतःसाठी स्विकारली.      
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
पर्यवेक्षण अधिकारी- शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
तपास अधिकारी- एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
सापळा व मदत पथक- डी वाय एस पी. श्री.शशिकांत एस.पाटील, पी आय.संजोग बच्छाव, पी आय.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.  
मार्गदर्शक- १) सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक २) एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. ३) सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी- आरोपी क्रं.१ यांचे  सक्षम अधिकारी अव्वर सचिव, महसुल व विनभाग, म. रा.मुंबई
आरोपी क्रं.२ यांचे सक्षम अधिकारी
मा.जिल्हाधिकारी सो.जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव
आरोपी क्रं. ३ यांचे सक्षम अधिकारी
मा.उप विभागीय अधिकारी सो. भुसावळ भाग