पाचोरा शिवसेनेची मागणी;आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली.त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत तुरुंगात टाका

0
519

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि.७ मार्च २०२२

किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- पाचोरा शिवसेनेची मागणी; पुतळा दहनासह महिलांकडून चपलेचा मार
आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या
पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी
गद्दारी केली आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
दाखल करून त्वरीत तुरुंगात टाका अशा प्रमूख
मागणी साठी पाचोरा शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी खा.सोमय्या यांचे छायाचित्र असलेल्या बॅनर ला महिला पदाधिकाऱ्यांकडून चपलांचा चोप देण्यात आला तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सदरील निवेदनात म्हटले आहे की, २०१३ मध्ये
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट
सोमय्याने मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य
सरकारांनी असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या
पुढे आले आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी
रेल्वे स्थानकांवर विमानतळावर डबे घेऊन उभा
राहिले. आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं
अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते
दान केलं, नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक
अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या
रकमेचं किरीट सोमय्याने काय केलं ते देशाला
समजायला हवं, ही रक्कम तो भंगारात जाऊ
पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक
बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता,
मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला
मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं
आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने
गद्दारी केलं आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
दाखल व्हायला हवा
किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली
गोळा केलेल्या निधीचं काय झालं ? हा प्रश्न
महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित
आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत
वाचवण्यासाठी देणगी दिली. राजभवनानं
आपल्याला किरीट सोमय्याकडून कोणताच निधी
चेक मिळाला नसल्याची माहिती
अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण
देताना म्हटलं आहे. किरीट सोमय्याने गोळा केलेला
पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या
खिशात गेला ? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे
राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत.
या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १००
कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायात गुंतवले आहेत त्यामुळे देशद्रोही किरीट सोमय्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आम्ही निवेदन देत आहोत.
यावेळी युवा नेते सुमीत किशोर पाटील शिवसेना नेते मुकुंद बिलदिकर,शहर प्रमुख किशोर बारावकर,बंडू चौधरी बापू हटकर गंगाराम पाटील अनिल सावंत, गजू पाटील, रवी केसवाणी, प्रवीण ब्राह्मणे, बापू निंबाळकर, पप्पू जाधव, युवासेना शहरप्रमुख संदीपर पाटील, जितू पेंढारकर, वैभव राजपूत, आण्णा चौधरी, जावेद देशमुख, तात्या चौधरी, प्रदीप पाटील, नितीन चौधरी, किशोर पाटील, सागर पाटील, आबा कुमावत, मयूर महाजन, रवी पाटील, प्रवीण पाटील, आकाश पाटील, पिंटू मराठे, भूषण पाटील, अक्षय जैन, निखिल भोई, मोठ्या प्रमाणात शिवसेना युवासेना महिला आघाडी च्या सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.