आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि. ८ मार्च २०२२
भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका तसेच इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान
नेरी येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील बाळद गणांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कोरोना काळात ग्रामीण भागात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य,महसूल व स्थानिक प्रशासनातील सर्व कर्मचारी यांनी आपल्या परीवारापासुन दुर राहून रुग्णांच्या व जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतली.
तसेच लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक/सेविकांनी लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अहवाना नुसार लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवला त्याबद्दल या सर्व कर्मचारी व सेवक/सेविका यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचे मनोबल वाढवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बाळद-नेरी गणातील सर्व गावांमधील आरोग्य सेविका, आशा सेविका,आरोग्य केंद्रातील कर्मचारी,पोस्टमन यांनादेखील सन्मानचिन्ह देऊन भेटवस्तू देण्यात आल्या
वाढदिवसानिमित्त कुठलाही बडेजाव न करता तथा व्यर्थ खर्च नकरता गोविंद शेलार यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू दिल्या त्याबद्दल अमोल शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, भाजपा भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील,भाजपा चिटणीस सोमनाथ पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे नगरसेवक शीतल सोमवंशी,सुभाष पाटील,बन्सीलाल पाटील, इतर ओबीस जि. सरचिटणीस प्रदीप बापू पाटील,नंदू सोमवंशी,भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी,महेश पाटील,ता.चिटणीस शरद पाटील व किशोर पाटील नगरदेवळा शहरअध्यक्ष नामदेव भाऊ . किरण सर ,रवी बाबा , नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊळ, राजेंद्र पवार ,राजेंद्र महाजन ,संजय कुंभार ,बापू चौधरी ,विनोद परदेशी ,यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी गोविंदभाऊ मित्र परिवार व सर्व नेरी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
Home Uncategorized भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त बाळद-नेरी गणांत आशा व आरोग्य सेविका...