बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (एन मुक्टो) च्या भडगाव शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली

0
166

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि. ८ मार्च २०२२
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (एन मुक्टो) च्या भडगाव शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन मुक्टो भडगाव शाखेच्या सर्व सभासदांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ अशा दोन वर्षांसाठी नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.
या सभेत अध्यक्ष म्हणून डॉ. अतुल देशमुख, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, सचिव डॉ. दिनेश तांदळे, कोषाध्यक्ष डॉ. अविनाश भंगाळे, केंद्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी डॉ.एन व्ही. चिमणकर, जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी डॉ. एस. जी. शेलार तर निवृत्त प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून प्रा. पी. डी. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रा. एल.जी.कांबळे, डॉ. दीपक मराठे, प्रा.एम.डी. बिर्ला, प्रा.एस.एम. झाल्टे, प्रा. प्रदीप वाघ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सभेत नूतन कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. नूतन कार्यकारिणीने प्राध्यापकांच्या हक्क व न्यायासाठी तसेच विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. एन मुक्टो संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, केंद्रीय सचिव प्रा. डॉ. जितेंद्र तलवारे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. नितीन बाविस्कर व जळगाव जिल्हा सचिव प्रा. मुकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.