पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या चा जाहिर निषेध

0
527

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि. ९ मार्च २०२२
पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या चा जाहिर निषेध
पाचोरा (प्रतिनिधी) पद्मविभूषण मा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मुंबई येथील निवासस्थानावर काही लोकांकडून भ्याड हल्ला करण्यात आला, या हल्लेखोरांचा आम्ही पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जाहिर निषेध करतो. तसेच या भ्याड हल्लेखोरांमागे कोणती राजकीय शक्ती आहे ? याचा त्वरीत शोध घ्यावा, याची सखोल चौकशी करावी व या भ्याड हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कडक अशी कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात ते असे कृत्य पुन्हा करणार नाही. या मागणीचे निवेदन पाचोरा पोलिस प्रशासनास व तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलिप भाऊ वाघ, गटनेते संजय नाना वाघ ,तालुकाध्यक्ष विकास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितिन तावडे, शहराध्यक्षअझर खान, नगरसेवक वासुदेव महाजन. अशोक मोरे, सतीश चौधरी, प्रकाश भोसले, युवकांचे सुदर्शन सोनवणे, महिला पदाधिकारी रेखाताई पाटील, रणजित पाटील, वासुदेव माळी, बशीर बागवान, योगेश पाटील, नाना देवरे, शशिकांत चंदिले, सुदाम वाघ, एस टी अहिरे, शेख रसूल, माणिक पाटील,भगवान मिस्त्री, रणजीत पाटील, ए .बी. अहिरे, एडवोकेट अविनाश सुतार, अनिल सावंत गाळण, बी एस पाटील, विजय पाटील, आर एस पाटील, एस आर माने, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जोरजोरात घोषणा देण्यात आल्या व हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई बाबत निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते